Manohar Joshi Passed Away। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे आज पहाटे निधन झाले. वयाच्या 87 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मध्यरात्री 3 वाजता मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मनोहर जोशींच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी आपले सर्व नियोजित दौरे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे बुलढाणा दौऱ्यावर होते. मनोहर जोशींच्या निधनाची बातमी समजताच त्यांनी आपला नियोजित दौरा रद्द केला. ते मुंबईकडे रवाना होणार आहेत. मनोहर जोशी यांचे पार्थिव हिंदूजा रुग्णालयातून सकाळी नऊ वाजता माटुंगा येथील त्यांच्या निवासस्थानी नेण्यात येणार आहे. सकाळी 11 ते 2 या दरम्यान अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात येईल, अशी माहिती मिळाली आहे.
उद्दव ठाकरेंचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द Manohar Joshi Passed Away।
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे पूर्व नियोजीत दौऱ्यामुळे सध्या शेगाव तालुक्यात आहेत. शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी दिलेल्या माहीतीनुसार उद्धव ठाकरे यांचे आजचे बुलढाणा जिल्हा दौऱ्याचे सर्व नियोजीत कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील आजच्या नियोजित तीन सभा रद्द करण्यात आल्या आहेत. उद्धव ठाकरे शेगाव वरुन संभाजीनगर विमानतळ आणि तिथून मुंबईला येतील. त्यानंतर ते मनोहर जोशी यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतील, अशी माहिती मिळाली आहे.
एका शब्दावर दिला राजीनामा Manohar Joshi Passed Away।
दरम्यान. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केल्यावर पहिल्या फळीतील शिवसैनिक म्हणून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. मुख्यमंत्री असतांना जावयाला भूखंडाचा लाभ मिळवून देण्याचा कथित आरोप त्यांच्यावर झाले. त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जोशी यांना चिठ्ठी पाठवत राजीनामा देण्यास सांगितले. तेव्हा तात्काळ आदेश मानत जोशी यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. ही नाट्यमय घटना त्यानंतर अनेक महिने चर्चेचा विषय ठरली होती.
हेही वाचा
बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक हरपला ! माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन
तसेच ऑक्टोबर २०१३ च्या शिवाजी पार्क इथे झालेल्या दसरा मेळाव्यात मनोहर जोशी यांच्या विरोधात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली होती. नोव्हेंबर २०१२ ला बाळासाहेब ठाकरे यांचे निधन, त्यानंतर त्यांच्या स्मारकाचा विषय, त्यावर केलेली टिप्पणी यामुळे मनोहर जोशी यांना शिवसैनिकांनी लक्ष्य केले होते.