मुंबई – अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच विविध कारणासाठी चर्चेत असते. तिचा मोठा चाहता वर्ग भारतासह परदेशात देखील आहे. नुकतेच मलायका दुबईमध्ये एका कार्यक्रमासाठी गेली होती. त्याठिकाणी मोठी गर्दी होती. यावेळी तिला पाहून चाहते देखील खूप आनंदी झाले होते. चाहत्यांनी देखील तिच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी तिच्याभोवती मोठी गर्दी केली होती.
चाहत्यांची झालेली गर्दी पाहून मलायका देखील अस्वस्थ झाली होती. तिच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक दिसत होता. मात्र गर्दीत तिला काही महिला चाहत्यांचा धक्का लागला. त्यामुळे ती चांगलीच संतापली. ‘कृपया धक्का देऊ नका’ असं मलायकाने एका महिलेला म्हंटले. याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
दुबईच्या या कार्यक्रमात मलायकाचा ग्लॅमरस अवतार पाहायला मिळाला. यावेळी मलायकाने चमकदार काळ्या रंगाचा बॅकलेस गाऊन परिधान केला होता. तिचा हा लुक अनेकांच्या पसंतीस पडला. या कार्यक्रमादरम्यान तिने पत्रकार परिषदेला हजेरी लावली होती. त्यानंतर चाहत्यांची भेट घेत संवाद साधला आणि सेल्फी घेतला.
View this post on Instagram
दरम्यान, मलायका अरोरा नेहमीच तिच्या हॉट आणि बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. मलायका तिच्या हॉटनेसने सोशल मीडियाचे तापमान वाढवत असते. कधी साडी तर कधी गाऊन परिधान करून मलायका आग लावते. याशिवाय ती बॉयफ्रेंड अर्जुन कपूरमुळे देखील नेहमीच चर्चेत असते.