मुंबई – काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी कर्नाटक दौऱ्यावर आहेत. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी जाहीर सभा घेतल्या. मात्र, ब्रेक दरम्यान त्यांनी थेट डोसा बनवण्याचा आनंद घेतल्याचे पाहायला मिळाले. प्रियांका गांधी म्हैसूरच्या सर्वात प्रसिद्ध मैलारी रेस्टॉरंटमध्ये नाष्टा करण्यासाठी गेल्या होत्या. तिथे पोहोचल्यावर त्यांच्या मनात डोसा बनवण्याची इच्छा आली आणि त्या थेट किचनमध्ये गेल्या.
यावेळी प्रियांका गांधी यांच्यासमवेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार, पक्षाचे सरचिटणीस आणि कर्नाटकचे प्रभारी रणदीप सिंग सुरजेवाला यांच्यासह इतर प्रमुख कार्यकर्ते देखील होते. नाष्टा करून झाल्यानंतर प्रियांका गांधी यांनी डोसे बनवण्याची इच्छा येथील हॉटेल मालकांकडे व्यक्त केली आणि त्या थेट किचनमध्ये दाखल झाल्या.
प्रियंका गांधी रेस्टॉरंटच्या स्वयंपाकघरात पोहोचल्या. प्रथम त्यांनी रेडी असलेले डोसा पिठ घेतले आणि ते योग्य आकारात पसरवला. यावेळी सोबत असणाऱ्यांनी त्यांना अजून डोसे बनवण्याची विनंति केली तेव्हा प्रियांका गांधी यांनी एक नाही दोन नाही तर तब्बल सहा डोसे बनवले. याचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. ज्यामध्ये प्रियांका गांधी आपल्या हाताने डोसे बनवताना दिसत आहेत.
Perfect dosas are just the beginning; with such skillful hands, there’s no limit to the power they can bring to the world. pic.twitter.com/qsgUw6IBeJ
— Congress (@INCIndia) April 26, 2023
त्यानंतर प्रियांका गांधी यांनी रेस्टॉरंट मालक आणि त्यांच्या कुटुंबियांचे आभार मानले आणि त्यांच्यासोबत सेल्फी देखील घेतला.काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर प्रियंका गांधी यांचा डोसा बनवतानाचा व्हिडिओही शेअर केला आहे. ‘परिपूर्ण डोसा ही फक्त सुरुवात आहे’ अशा कॅप्शनखाली हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.