बनिहाल – जम्मू काश्मिरात रामबन जिल्ह्यात एका मेजर दर्जाच्या लष्करी अधिकाऱ्याने स्वतावर रायफल मधून गोळी झाडून आत्हत्या केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे.
मेजर परविंदरसिंग असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. ते मूळचे दिल्लीचे रहिवासी होते. ते सध्या लष्कराच्या बनिहाल येथील महुबल कॅम्प मध्ये लष्करी वसाहतीत वास्तव्याला होते.त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अजून समजू शकलेले नाही.
या प्रकरणात पोलिसांनी आकस्मात मृत्यू अशी नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. मेजर परविंदरसिंग यांना लष्करी सेवेत जी रायफल देण्यात आली आहे त्याच रायफली मधून त्यांनी स्वतावर गोळी झाडली.
लष्करी कॅम्प मधील निवासस्थानीच त्यांच्याकडून हा प्रकार झाला आहे. 29 वर्षीय तरूण लष्करी अधिकाऱ्याने आत्महत्या करण्याच्या प्रकाराची वरीष्ट पातळीवरून गंभीर दखल घेण्यात आली आहे.