मुंबई – महिमा गुप्ताने तिचे लेटेस्ट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये अभिनेत्रीने ब्लॅक कलरच्या जिम आउटफिटमध्ये फोटो शेअर केल्याचे पाहायला मिळत आहे. फोटोंमध्ये ती वर्कआउटनंतर मिरर सेल्फी घेताना दिसली आहे.
तिचा मिरर सेल्फी शेअर करत महिमाने एका नवीन प्रोजेक्टबद्दल सांगितले आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘चला काहीतरी नवीन सुरू करूया.’ लोक तिच्या पोस्टवर गॉर्जियस आणि हॉट अशा कमेंट करत आहेत.
महिमा गुप्ता खऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे आणि तिला ‘गंदी बात 6’ या वेब सीरिजमधून लोकप्रियता मिळाली. यामध्ये तिच्या बोल्ड सीन्सची खूप चर्चा झाली होती.तिचा जिम मधील हा वर्क आऊट पाहून अनेकांनी तिला ‘गंदी बात’मध्ये कशाला काम करते असा सवाल विचारला आहे.
अभिनेत्री वास्तविक जीवनात एक फिटनेस फ्रीक आहे. ती तिच्या फिटनेसची खूप काळजी घेते आणि जिममधून फोटो शेअर करत असते, जे चाहत्यांना खूप आवडतात.
महिमा गुप्ताच्या भोजपुरीतील कामाबद्दल बोलायचे झाले तर यश कुमारसोबत तिची ‘लव के कबूतर’ आणि ‘ऐसे का निरखत तारा’ ही गाणी रिलीज झाली आहेत. ही गाणी तिच्या ‘पति पत्नी और भूतनी’ या चित्रपटातील आहेत.