कात्रज – महेश नागरी मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटीचा रौप्य महोत्सवी वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. गरजूंना आर्थिक मदतीचा हात देऊन स्वावलंबी बनवण्यासाठी “महेश नागरी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीची ओळख आहे. संस्थेने पारदर्शक कारभाराने ग्राहकांचा विश्वास संपादन करून प्रगतीची गरुड भरारी घेतली आहे.
संस्थेची स्थापना स्व. धनराज राठी यांनी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर १९९८ मध्ये केली होती. तेंव्हापासून संस्थेने ग्राहकांचे हित जपले आहे. संस्थेचा विस्तार मोठा असून ५ शाखा महाराष्ट्रात तर एक शाखा राजस्थानमध्ये आहे. या वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या सुखसागरनगर येथील मुख्य कार्यालयात आयोजित केलेल्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व संस्थेच्या सभासदांनी उपस्थित राहत शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजेश राठी यांच्या हस्ते सत्यनारायण पूजा आणि होमहवन करण्यात आले.
संस्थेच्या एकूण १६८ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. तर, कर्जवाटप ९८ कोटी रुपयांचे असून सभासद संख्या ७ हजारावर पोहोचली आहे. तर या वर्षात संस्थेला १ कोटी ४५ लाख रुपयांचा नफा प्राप्त झाला आहे. रौप्य महोत्सवानिमित्त सभासदांसाठी खास विशेष ठेव योजना, मासिक ठेव योजना देण्यात आल्या आहेत. या योजनांवर ८.५० टक्के व्याजदर मिळणार असल्याने सभासदांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला असल्याचे व्यवस्थापकीय संचालक मगराज राठी यांनी सांगितले. यावेळी संस्थेचे सर्व संचालक आणि कर्मचारी उपस्थित होते.