Audio and video calls on X – X (पूर्वीचे Twitter) ने दीर्घ प्रतीक्षा आणि चाचणीनंतर ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलिंग वैशिष्ट्य जारी केले आहे. X चे अनेक वापरकर्ते ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलिंगचे फीचर पाहू शकत आहेत. अनेक वापरकर्त्यांनी X अॅप उघडताच ऑडिओ-व्हिडिओ कॉलिंगची सूचना प्राप्त झाली आहे.
वापरकर्त्यांना X अॅपवर “Audio and video calls are here!” नावाचे नोटिफिकेशन मिळत आहे. याशिवाय, अॅप सेटिंग्जमध्ये “Enable audio and video calling” हा नवीन पर्याय देखील दिसत आहे, मात्र हे नवीन फिचर केवळ X प्रीमियम वापरकर्त्यांसाठी म्हणजे ब्लु’टीकधारी यांच्यासाठीच आहे की सामान्य वापरकर्त्यांसाठीही आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
नवीन अपडेटनंतर, तुम्ही तुमच्या फॉलोअर्ससोबत, तुम्ही फॉलो करत असलेल्या आणि सत्यापित वापरकर्त्यांसोबत ऑडिओ-व्हिडिओ कॉल करू शकाल. तुम्हाला डायरेक्ट मेसेज (DM) मध्ये ऑडिओ-व्हिडिओ कॉलचा पर्याय मिळेल. DM वरून तुम्ही व्हिडिओ किंवा ऑडिओ कॉल निवडू शकता.
एक्सचे मालक इलॉन मस्क या फिचरवर बऱ्याच काळापासून चर्चा करत होते. नवीन फीचर आल्यानंतर एक्स मेटा चे फेसबुक अॅप आणि व्हॉट्सअॅप सारख्या अॅप्सशी स्पर्धा होईल. नवीन फीचर सर्व प्लॅटफॉर्म iOS, Android, Mac आणि संगणकासाठी उपलब्ध असेल. X वर ऑडिओ-व्हिडिओ कॉलिंगसाठी फोन नंबरची आवश्यकता नाही.