लातूर – ढाळेगाव येथील ग्रामपंचायत (dhalegaon) सदस्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. “दुष्काळ जगू देत नाही आणि आरक्षण शिकू देत नाही,” असा स्टेटस ठेवून या तरुणाने स्वतःच जीवन संपवले आहे. या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे. (Maratha Arakashan)
महेश कदम (Mahesh Kadam) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. राज्यात काही दिवसांपासून पुन्हा एकदा मराठा आरक्षणाची मागणी जोर धरू लागली आहे. मात्र, अजूनही यावर तोडगा काढण्यास सरकारला यश मिळाले नाही. यामुळे अनेक तरुण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवत आहे.
महेश कदम हा 26 वर्षाचा तरुण ढाळेगावचा ग्रामपंचायत सदस्य आहे. शिक्षण झालेले असल्याने तो नोकरीच्या शोधात होता. वडील सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात महेश सक्रिय कार्यकर्ता म्हणून मागील अनेक दिवसांपासून काम करत होता. (Sucide for maratha reservation)
मात्र, मराठा आरक्षणाचा (Maratha Resevation) विषय मार्गी लागत नसल्याने तो सातत्याने चिंतेत होता. यातच त्याने स्टेटस ठेवत विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. या घटनेनंतर लातूर जिल्ह्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी अहमदपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.