नीरा-पुरंदर तालुक्यात भारतीय जनता पार्टीने युतीधर्माला तिलांजली देत शुक्रवारी (दि. 4) पुरंदर-हवेली मतदारसंघातून उमेदवारी आर्ज दाखल केला आहे. अर्थात याकडे बंडखोरी म्हणून पहिले जात असले, तरी उमेदवारी अर्ज दाखल करताना पक्षातील सर्वच नेते उपस्थित होते. दरम्यान, हा बंडोबा पक्षश्रेष्ठी शांत करणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत विजय शिवतारे यांनी भाजप विरोधी वक्तव्य केल्याचे म्हणत भाजप कार्यकर्त्यांनी गुरुवारी (दि. 3) शिवातारेंच्या अर्ज दाखल करण्याच्या कार्यक्रमाला हजर न राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, यानंतर भाजप कार्यकर्त्यांची मनधरणी करण्यात शिवतारे अयशस्वी ठरले आणि शुक्रवारी भाजपचे गिरीश जगताप यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपच्या या उमेदवारीचा विजय शिवतारे यांना फटका बसू शकतो असे बोलले जात आहे.