पुणे -क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची पणती सून नीता होले आणि ऍड. सतीश कांबळे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची पुण्यात भेट घेतली.
मनसे प्रमुख राज ठाकरे हे पुणे दौऱ्यावर असताना ही भेट झाली. दरम्यान, यावेळी काही ऐहिासिक घटना, पुस्तकांवरही चर्चा झाली. यावर “महात्मा फुले यांनी महाराष्ट्रात मुले व मुलींसाठी 20 शाळा सुरू केल्या. या सर्व शाळा आणि त्या जागांवर सरकारचा ताबा आहे. तसेच भिडेवाडा आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकासंबंधी सरकारने वेळोवेळी अनेक घोषणा केल्या. या सर्व शाळांच्या जमिनींचा मालकीहक्क वारसाहक्काने महात्मा फुले कुटुंबीयांचा आहे. त्यामुळे या जागा वारसांच्या ताब्यात मिळाव्यात. त्यासाठी आपण लक्ष घालून आम्हाला न्याय द्यावा,’ अशी मागणी होले यांनी राज ठाकरे यांच्याकडे केली. त्यावर ठाकरे यांनी सकारात्मक भूमिका घेत शासन दरबारी याबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन होले यांना यावेळी दिले. यावेळी अनिल शिदोरे, बाबू वागसकर, पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर, मनसे विधी विभाग प्रदेश अध्यक्ष ऍड. किशोर शिंदे, ऍड. सतीश कांबळे उपस्थित होते.