मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली असून अधिवेशन कालावधीतील विधानसभा तालिका अध्यक्षांची नावे जाहीर करण्यात आली.
महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज पासून प्रारंभ होत आहे. pic.twitter.com/vvomSsUB46
— महाराष्ट्र परिचय केंद्र (@MahaGovtMic) August 17, 2022
तालिका अध्यक्षपदी सदस्य संजय शिरसाट, कालिदास कोळंबकर, मनोहर चंद्रिकापुरे, शिरीष चौधरी यांची नावे नामनिर्देशित करण्यात आल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांनी यावेळी केली.