Maharashtra Assembly Interim Budget Session। राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांकडून (Ajit Pawar) अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात केली. अजित पवारांनी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कुसुमाग्रजांची कविता सादर करुन भाषण सुरु केले. राज्यात येत्या काही महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची घोषणा होणार आहे, त्यामुळे महायुतीचा हा अंतरिम अर्थसंकल्प असणार आहे.
१ लाख महिलांना रोजगार देणार Maharashtra Assembly Interim Budget Session।
दरम्यान, या अर्थसंकल्पात महायुती सरकारने महिलांच्या विकासावर भर दिल्याचे दिसले. राज्यातील १ लाख महिलांना रोजगार देणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. त्यासोबतच पाच हजार पिंक रिक्षा महिलांसाठी दिल्या जाणार आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा
कुसुमाग्रजांच्या कवितेने अजित पवारांची अर्थसंकल्प वाचनाला सुरुवात ; अर्थसंकल्पात गुंतवणुकीवर भर
३७ हजार आंगणवाडयांना सौर ऊर्जा
पुढे राज्याला ऊर्जा प्रकल्पाविषयी अजित पवारांनी राज्यातील तब्बल ३७ हजार अंगणवाड्यात सौर ऊर्जा प्रकल्प राबविणार असल्याचे सांगितले. तसेच ४० टक्के अपारंपारिक उर्जा राबविणार आहे. तसेच ४४ लाख नुकसान झालेल्या शेतकरी यांना ३ हजार कोटी रुपयांची मदत देण्यात आलीय. एवढेच नाही तर आंगणवाडडी सेविका याची १४ लाख पद भरण्यात आली आहेत अशी माहिती देखील त्यांनी दिली.
शेतकऱ्यांसाठी सौर कृषीपंप योजनेची सुरुवात करण्यात येणार आहे. या अंतर्गत ८ लाख ५० हजार नवे सौर कृषीपंप बसवण्यात येणार असल्याचं अजित पवार म्हणाले. त्यासोबतच ऊर्जा विभागासाठी ११९३४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ७ हजार मेगावॅट ऊर्जा निर्मितीचं सरकारचं लक्ष्य आहे.
हेही वाचा
Maharashtra Budget Session 2024 Live । – क्रीडा विभागासाठी ५३७ कोटींच्या निधीची तरतूद