Mahadev jankar Lok sabha election 2024 : महाविकास आघाडीने आपल्याला लोकसभेची उमेदवारी दिल्यास आपण अडीच लाख मतांच्या फरकाने विजयी होऊ. एवढेच नव्हे तर आपण बारामती मतदार संघात सुप्रिया सुळे यांच्या बाजूनेही ठामपणे उभे राहू असे जानकर यांनी म्हटले आहे. माढा आणि बारामती हे पश्चिम महाराष्ट्रातील शेजारचे मतदारसंघ आहेत. त्यामुळे आपण माढा लोकसभा मतदारसंघातून विजयी होऊ शकतो असा विश्वास जाणकरांनी व्यक्त केला.
भारतीय जनता पक्षाने माढा येथून खासदार रणजित निंबाळकर यांना उमेदवारी दिली असली तरी त्यांच्या उमेदवारीबाबत अजून संभ्रमाचे वातावरण आहे. महाविकास आघाडीनेही अजून तेथून आपला उमेदवार निश्चीत केलेला नाही. | Mahadev jankar Lok sabha election 2024
जानकर यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसचे (एसपी) अध्यक्ष शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली होती त्यावेळेपासून जानकर हे महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे. आज त्यांनी आपली इच्छा प्रथमच उघडपणे बोलून दाखवली आहे. | Mahadev jankar Lok sabha election 2024
जाणकर म्हणाले की मी २००९ ची लोकसभा निवडणूक माढा येथून शरद पवार यांच्या विरोधात लढवली आणि ९८,७४३ मते मिळवून तिसऱ्या क्रमांकावर आलो. माढा आणि बारामतीमध्ये माझ्या पक्षाचा जनाधार आहे. माझे कार्यकर्ते ओबीसी, धनगर समाजातील आहेत आणि मी अडीच लाख मतांनी विजयी होईल, असे जानकर यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. | Mahadev jankar Lok sabha election 2024
जानकर यांनी दावा केला की, शरद पवार त्यांना माढामधून विजयी करण्यास मदत करतील, तर बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना आपली मदत होईल. भाजपने आपले आमदार राहुल कुल यांना फोडल्याचा आरोपही त्यांनी केला. माढ्यातील जनता विद्यमान खासदार निंबाळकर यांच्यावर नाराज आहे असा दावाही जानकर यांनी केला. | Mahadev jankar Lok sabha election 2024