Mahadev Betting App : सध्या देशभरात ‘महादेव बेटिंग अॅप’ हे प्रकरण चर्चेत आले आहे. महादेव बेटिंग ऍपच्या प्रवर्तकांनी छत्तिसगढचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांना 508 कोटी रूपये दिल्याची माहिती चौकशीतून पुढे आली, असा दावा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केला. यानंतर पुन्हा हे प्रकरण चर्चेत आले आहे. महादेव बेटिंग अॅप आणि त्याचे संस्थापक सौरभ चंद्राकर याने मागील काही दिवसांपासून छत्तीसगडच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. मात्र ‘महादेव बेटिंग अॅप’ हे नेमकं काय आहे ? तसेच या अॅपच्या संस्थापकाने करोडोंचा गेम कसा बनवला. याबाबत आपण जाणून घेऊयात…
केंद्र सरकारने महादेव बेटिंग अॅपसह 22 बेकायदेशीर बेटिंग अॅप आणि वेबसाइट ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये ‘महादेव बुक ऑनलाइन’ आणि ‘रेड्डियान्ना प्रेस्टोप्रो’ प्लॅटफॉर्मचा समावेश आहे. सरकारचा हा आदेश अशा वेळी आला आहे जेव्हा अंमलबजावणी संचालनालय (ईडी) महादेव अॅपविरोधात चौकशी करत आहे. या प्रकरणामुळे छत्तीसगडमधील निवडणुकीचे राजकारण चांगलेच तापले आहे. राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनीही हे बेटिंग अॅप तयार करण्यात मदत केल्याचा आरोप आहे.
कोण आहे सौरभ चंद्राकर?
महादेव अॅपचे संस्थापक सौरभ चंद्राकर हे सामान्य कुटुंबातून आलेले आहेत. 2018 पूर्वी तो छत्तीसगडच्या भिलाई येथे राहत होता आणि ‘महादेव ज्यूस सेंटर’ चालवत होता. त्यावेळी त्याला ऑनलाइन अॅप्सवर सट्टा लावण्याचे शौकीन झाले आणि यादरम्यान त्याचे 10 ते 15 लाख रुपयांचे नुकसान झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, महादेव अॅपचे सह-संस्थापक रवी उप्पल हे देखील सौरभचे जुने मित्र आहेत. अनेक लहानमोठ्या नोकऱ्याही केल्या. सौरभप्रमाणेच त्यालाही जुगार खेळण्याची शौकीन असल्याने त्याचेही 10 लाखांचे नुकसान झाले होते.
मग असा काळ आला जेव्हा दोघांवर पैशांचा वर्षाव झाला. दोघेही दुबईला गेले आणि कसे तरी पैसे जमवण्यात यशस्वी झाले. यानंतर दोघांनी मिळून ‘महादेव बुक अॅप’ उघडले. सौरभ चंद्राकर यांनी छत्तीसगडमधील भिलाई येथील त्यांच्या ज्यूस सेंटरच्या नावावरून हे नाव दिले. हे अॅप विकसित करण्याचे काम भारतीय आणि युरोपियन कोडर्सनी केले आहे. ते २०२० मध्ये लाँच करण्यात आले. त्यानंतर दोघांनी मिळून या अॅपची 2 हजारांहून अधिक केंद्रे उघडली.
सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांनी ‘महादेव अॅप’च्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी कमिशन मॉडेल स्वीकारले. जो कोणी अॅपवर बेटिंग सेंटर चालवतो त्याला कलेक्शननुसार कमिशन मिळेल. केंद्रांवर जमा झालेली मोठी रोकड हवाला नेटवर्कद्वारे दुबईला पाठवण्यात आल्याचे ईडीच्या तपासात म्हटले आहे. यामध्ये दाऊद इब्राहिमच्या टोळीतील माणसे त्याला मदत करत असत.
या पद्धतीने केले जाते काम
महादेव बुक अॅपवर लोकांना अनेक प्रकारचे गेम्स ऑफर केले जातात. यात पोकर, कार्ड गेम, चान्स गेम्स, बॅडमिंटन, टेनिस, फुटबॉल आणि क्रिकेट यांचा समावेश आहे. पत्त्याच्या खेळांमध्ये लोकांना तीन पट्टी, पोकर आणि ड्रॅगन टायगरसारखे खेळ दिले जात होते. हे अॅप बंद गट म्हणून चालते. हे अनेक वेगवेगळ्या इन्स्टंट मेसेजद्वारे काम करायचे. लोकांना मेसेजद्वारे अॅपवर खेळण्यासाठी आमंत्रणे मिळतील. तर सौरभ आणि रवी असे 4 किंवा 5 प्लॅटफॉर्म चालवतात आणि दररोज 200 कोटी रुपये कमावले जातात.
‘महादेव ॲप’ची माहिती कशी आली समोर?
2020 मध्ये प्राप्तिकर विभागाने सनछत्तीसगडमध्ये अनेक व्यावसायिक, राजकीय व्यक्ती आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या घरावर छापे टाकले. चौकशीदरम्यान ‘महादेव ॲप’चे नाव पुढे आली होती. ‘ईडी’ने ऑगस्ट 2023 मध्ये महिन्यात छत्तीसगडचे सहायक उपनिरीक्षक चंद्रभूषण वर्मा, सतीश चंद्राकर, हवाला ऑपरेटर अनिल दम्मानी आणि सुनील दम्मानी यांना अटक केल्यानंतर पहिल्यांदा महादेव ॲपबाबत जाहीरपणे माहिती दिली.
तर कोलकाता, भोपाळ, मुंबईसह सुमारे 39 शहरांमध्ये छापासत्र राबवले. 417 कोटींची मालमता हस्तगत केली. यामध्ये रोख रक्कम आणि इतर स्थावर मालमत्तांचा समावेश आहे. मध्यंतरी या ‘महादेव बेटिंग अॅप’ प्रकरणात बॉलिवूडमधील काही कलाकरांची नावे देखील समोर आली होती.