मुंबई – माँ कांचनगिरी यांनी आज राज ठाकरेंची भेट घेतली आहे. या भेटीबाबत त्यांनी माँ कांचनगिरी यांनी माध्यमांशी बोलतांना राज ठाकरेंना ‘हिंदू सम्राट’ अशी उपमा दिली. दरम्यान, हिंदुत्वाच्या मुद्यावरून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे चांगलेच आक्रमक झाले आहे. मध्यंतरी राज ठाकरे अयोध्येला जाणार होते. पण, भाजप खासदार ब्रृजभूषण यांनी विरोध केल्यामुळे दौरा रद्द करावा लागला होता. पण, आता कांचनगिरी माँ यांनी राज यांना अयोध्येच खास निमंत्रण दिले आहे.
यापूर्वी ऑक्टोबरमध्ये गुरु मॉं कांचनगिरी यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. गेल्या भेटीवेळी त्यांनी राज ठाकरेंना अयोध्येत येण्याचे आमंत्रण दिले होते. आज पुन्हा एकदा त्यांनी निमंत्रण दिलं आहे.
या भेटीबाबत मॉं कांचनगिरी पुढे म्हणाल्या,’त्यांच्या आरोग्याविषयी मी चौकशी केली. त्यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे त्यासंदर्भात मी त्यांची भेट घेतली. त्यांना चांगल्या आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या. त्यांचं आरोग्य चांगलं राहायला हवं. आज राज ठाकरेंमध्ये खऱ्या अर्थाने ‘हिंदूसम्राट’ आपल्याला दिसतात. त्यामुळे मी त्यांना भेटायला आले”, असं माँ कांचनगिरी यावेळी म्हणाल्या आहे.