पिंपळे गुरव, दि. 5 – दापोडी येथे प्रभू भगवान महावीर स्वामीजी यांचा जन्मकल्याणक दिनानिमित श्री शांतिनाथ जैन श्वेतांबर टेंपल ट्रस्ट दापोडी यांच्या वतीने रथयात्रा काढण्यात आली. काटे बंगला येथे माजी नगरसेविका माई काटे व शेखर काटे यांनी रथ यात्रेचे स्वागत केले.
प्रभू महावीर चरणी हार अर्पण करून पुष्पवृष्टी केली. पुढे संजय काटे मिरवणुकीमध्ये सहभागि झाले. माजी नगरसेवक राजेंद्र काटे व अनिकेत काटे यांनी रथ यात्रेचे स्वागत केले. आंबेडकर पुतळा, शिवाजी महाराज पुतळा येथून दापोडी गावठाण येथे विठ्ठल मंदिर ज्येष्ठ सदस्यांतर्फे रथ यात्रेचे स्वागत करण्यात आले. जैन स्थानक येथे प.पु. प्रशांतऋषीजी म. सा. यांनी भाविकांना मांगलिक आशीर्वाद दिले. सुंदरबाग मार्गे दापोडी जैन मंदिर येथे मिरवणुकीची सांगता झाली. श्री शांतिनाथ श्वेतांबर जैन टेंपल ट्रस्ट अध्यक्ष रमेश जैन, ट्रस्टी नरेंद्र ओसवाल, घिसुलाल जैन, प्रवीण शाह तसेच समाजातील दोनशे भाविक रथ यात्रेमध्ये सहभागी झाले होते. या प्रसंगी भोसरी पोलीस स्टेशन व वाहतूक शाखा यांच्या वतीने बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले होते.