दुकान मालकाने एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, ‘राहुल गांधी आल्याने आम्हाला आश्चर्य वाटले. ते बहुधा कोईम्बतूरला मीटिंगसाठी येत असतात. त्यांना गुलाब जामुन आवडतात, त्यांनी एक किलो मिठाई विकत घेतली. तसेच इतर मिठाई देखील चाखली. आम्हाला यामुळे मला आनंद झाला, आमचा दुकानाचे स्टाफही खुश झाला.’
बाबू पुढे म्हणाले की, ‘राहुल गांधी आमच्या दुकानात 25-30 मिनिटे थांबले. आमच्या दुकानात ते येणार आहे याची आम्हाला कल्पना नव्हती. आम्ही त्यांना पैसे देऊ नका अशी विनंती केली मात्र त्यांनी आम्हाला पैसे दिले.’
राहुल यांच्या भेटीमुळे आश्चर्यचकित झालेल्या तेथील कर्मचाऱ्यांनीही त्यांच्या भोवती गर्दी करीत त्यांच्या समवेत सेल्फी घेतले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री व द्रमुक नेते स्टॅलिन यांच्यासाठीही मिठाई खरेदी केली आणि ती त्यांना भेट दिली. त्यावर प्रतिक्रीया देताना स्टॅलिन म्हणाले की राहुल गांधी यांनी आजच मिठाई वाटली आहे याचा अर्थ येत्या ४ जुनला इंडिया आघाडी मिठाई वाटणार आहे.