Lok Sabha Election 2024 । देशात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील निवडणूक पार पडल्या. आता दुसऱ्या टप्प्यातील मतदान लवकरच होणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने भाजपला मोठा धक्का दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूरमधील भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू संजय क्षीरसागर हे शरद पवार गटात प्रवेश करणार आहे. भाजपमध्ये आपला अपमान होत असल्याचे सांगत त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संजय क्षीरसागर निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. त्यामुळे पक्षातून ते बाहेर पडत असल्याने हा फडणवीस यांना धक्का आहे. संजय क्षीरसागर हे उद्या २४ एप्रिल रोजी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. स्वत: संजय क्षीरसागर यांनी याबाबत माहिती दिली. संजय क्षीरसागर यांनी भाजपकडून मोहोळ विधानसभा निवडणूक देखील लढवली होती.
माध्यमांशी बोलतांना संजय क्षीरसागर म्हणाले,’भाजपत गेल्या दहा वर्षांत मला कायम अपमानास्पद वागणूक दिली गेली. त्यामुळे मी पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजप सोडण्यापूर्वी मी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. त्यांना पक्षात आपणास कसा त्रास दिला गेला, त्याचे पुरावे दिले, असे संजय क्षीरसागर यांनी सांगितले. संजय क्षीरसागर लोकसभा निवडणुकी दरम्यान पक्ष सोडत असल्याने भाजपाची अडचण निर्माण होऊ शकते.’