Sonu Nigam : मोठ्या उत्साहात 22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाचा सोहळा संपन्न झाला. अनेक बॉलीवूड कलाकरांनी या ऐतिहासिक सोहळ्यासाठी हजेरी लावली होती. गायक सोनू निगम देखील या सोहळ्यासाठी उपस्थित होता. यावेळी सोनू निगमच्या गाण्याचे सादरीकरण देखील करण्यात आले. सोनू निगमचा या कार्यक्रमातील गाण्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. यावरुन त्याला ट्रोल करण्यात आले. मात्र सोनू निगमने देखील ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.
मशिदीवरील लाऊड स्पीकरचे उदाहरण देत एका युजरने त्याला खोचक प्रश्न विचारला. ‘मला सोनू निगमला एक प्रश्न विचारायचा आहे की, ‘तुम्हाला तर लाऊडस्पीकच्या आवाजाचा त्रास होत होता, मग आज स्वत: लाऊडस्पीकरवर गात आहे’, असा प्रश्न या युजरने विचारला. त्यावर “लाऊडस्पीकरचा काहीच त्रास नाही. त्रास तर सकाळी कोंबड्याप्रमाणे बांग देण्याचा आहे. सकाळी ४ वाजता होणाऱ्या आरडाओरड्याचा आहे. जर, तुमच्या पोटात दुखत असेल तर त्याचा उपाय मेडिकल सायन्समध्ये नाही. त्याचा उपाय अध्यात्म शास्त्रात आहे”, असे उत्तर सोनूने दिले.
वैसे मुझे सोनू निगम से एक बात पूछनी थी, ‘आपको तो लाउड स्पीकर के आवाज़ से दिक्कत होती थी फिर आज आप लाउड स्पीकर में खुद गा रहें हैं’#justasking
pic.twitter.com/I5mDPT4T95— Rakesh Ranjan (@cartoonistrrs) January 23, 2024
दरम्यान, अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सोनू निगमसह शंकर महादेवन, कैलाश खेर आणि अनुराधा पौडवाल यांचे गाणे सादर झाले होते. मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या सोनू निगमच्या व्हिडिओनंतर ट्रोल करणाऱ्याला त्याने सडेतोड उत्तर दिले आहे. तसेच अनेकांनी सोशल मीडियावर सोनू निगमला पाठिंबा देखील दर्शवला आहे. सध्या सोनू निगमची पोस्ट चांगलीच चर्चेत आली आली आहे.