वाटेल ती किंमत मोजू, पण मराठा समाजाचे सगळे प्रश्न सोडवू – हसन मुश्रीफ

कोल्हापूर : मराठा आरक्षणावरून राज्यात   पुन्हा एकदा आंदोलनाची ठिणगी आज पडली आहे. आरक्षण कायदा रद्द झाल्यापासून छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यात रायगडावरून त्यांनी आंदोलनाची हाक दिली होती. त्यानुसार पहिलं आंदोलन कोल्हापूरात होत आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी होत असलेल्या या ‘मूक आंदोलन’ भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि वंचित बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर , ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे सहभागी झाले.

यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी माध्यमांशी बोलतांना आमच्याकडून जी चूक झाली, तीच चूक भाजप सरकारकडूनही झाली. आयोग न नेमता आम्ही समिती नेमून आरक्षण दिलं ही आमची चूक होती, असं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ  आघाडी सरकारची ‘ चूकही मान्य केली आहे.

काय म्हणाले हसन मुश्रीफ 
“पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात आघाडी सरकारने मराठा आरक्षण  दिलं. तेव्हा नारायण राणे समिती नेमून मराठा आरक्षण देण्यात आलं.  मात्र  आमच्याकडून जी चूक झाली, तीच चूक भाजप सरकारकडूनही झाली. आयोग न नेमता आम्ही समिती नेमून आरक्षण दिलं ही आमची चूक होती त्यामुळेच हायकोर्टाने आरक्षण नाकारलं, असं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं. कोल्हापुरात बोलताना त्यांनी ही जाहीर कबुली दिली.

ते पुढे म्हणाले,’सारथी, नियुक्ती पत्र असेल, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे कर्ज देणं असेल हे सगळे प्रश्न आम्ही पूर्ण करणार, वाटेल ती किंमत मोजू, पण मराठा समाजाचे सगळे प्रश्न सोडवू.’ अशी ग्वाही देखील ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या  –
मराठा आरक्षण: कोल्हापुरात मूक आंदोलनाला सुरुवात; चंद्रकांत पाटील, प्रकाश आंबेडकर यांचा सहभाग
हाताला सलाईन, अंगात अशक्तपणा, तरीही धैर्यशील माने भर पावसात मराठा मोर्चात अग्रस्थानी!
मराठा आरक्षणासाठी कोल्हापूरात संभाजीराजे यांचा मूक एल्गार
मराठा आरक्षण: मान-सन्मान राखून, करोनाचे नियम पाळून आंदोलन करू – संभाजीराजे
उपमुख्यमंत्री अजित पवार शाहू महाराजांच्या भेटीला; मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर केले ‘हे’ विधान

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.