प. बंगालमध्ये सरकार आल्यास ‘लव्ह जिहाद’वर कायदा

कोलकाता – बिहार आणि मध्य प्रदेशमध्ये भाजपने सत्ता काबिज केल्यानंतर आता भाजपने आपला मोर्चा पश्‍चिम बंगालकडे वळवला आहे. भाजप खासदार आणि पश्‍चिम बंगालच्या भाजप महासचिव लॉकेट चटर्जी यांनी 2021 मध्ये भाजप सत्तेत आल्यास पश्‍चिम बंगालमध्ये लव्ह जिहाद विरोधात कायदा तयार करु, असा दावा केला आहे.

तसेच लव्ह जिहादवर बंदी घालू, असेही त्यांनी म्हटले आहे. याआधी विश्व हिंदू परिषदेने पश्‍चिम बंगाल लव्ह जिहादच्या प्रकरणांमध्ये टॉप राज्यांपैकी एक असल्याचा आरोप केला होता.

पश्‍चिम बंगालमध्ये एका आंतरधर्मीय लग्न केलेल्या तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणी भाजप खासदार लॉकेट यांनी आज पीडित तरुणीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. तसेच पीडितेच्या मृत्यूला जबाबदार दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.

लॉकेट यांनी आरोप केला आहे की, बेहला भागातील हरिदेवपूर स्टेशनअंतर्गत येणाऱ्या परिसरात एका मुस्लीम व्यक्तीने हिंदू मुलीला फसवून लग्न केलं. ती गर्भवती राहिल्यावर तिची हत्या केली.
पश्‍चिम बंगालमधील मुलांना अशाचप्रकारे फसवण्यात येत आहे.

पीडित तरुणी देखील अशाचप्रकारे लव्ह जिहादचा बळी असून तिची हत्या झाल्याचा आरोप खासदार लॉकेट यांनी केलाय. लॉकेट चटर्जी म्हणाल्या, पोलिसांनी एफआयआर करुन जबरदस्तीने पीडितेच्या आई वडिलांना सही करायला लावली.

पीडितेच्या आई वडिलांनी एफआयआर दाखवण्याची मागणी केली, तर त्यांना नकार देण्यात आला. पोलिसांचं वर्तन बदललं नाही, तर आम्ही पोलीस स्टेशन समोरच धरणे आंदोलनाला बसू.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.