मुंबई – आपल्या मंजुळ स्वरांची मोहिनी टाकत अख्ख्या जगाला मंत्रमुग्ध करणाऱ्या गायिका आणि भारतरत्न पुरस्काराने सन्मानित लता मंगेशकर यांचे निधन झाले त्या ९३ वर्षांच्या होत्या.
शेकडो हिंदी चित्रपट आणि सुमारे 36 देश विदेशी भाषांमध्ये आपला स्वरसाज उमटवला. लता दीदींचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ रोजी इंदूरच्या पंडित दीनदयाळ मंगेशकर या परिवारात झाला होता.
दरम्यान, दीदींच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टी, संगीतसृष्टी आणि अवघा भारत पोरका झाला आहे. त्यांच्या निधनाने भारताचं रत्न गेल्याची भावना सर्वच स्तरातून व्यक्त होत आहे.
प्रसिद्ध गायक, संगीतकार शंकर महादेवन यांनी देखील ट्विट करत दीदींना श्रद्धांजली वाहिली आहे. “लता दीदी कायम आपल्यात राहतील! आम्हाला दीदी आशीर्वाद द्या.” या आशयाचे ट्विट शंकर महादेवन यांनी केलं आहे.
तसेच, अभिनेत्री निम्रत कौरनेही लता मंगेशकर यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. “भारताने आज तिचा आवाज गमावला आहे. दुसरा कधीही होणार नाही,” असं ट्विट तिने केलं आहे.