नवी दिल्ली – पश्चिम बंगालच्या विधानसभेच्या निवडणुकीप्रमाणे उत्तर प्रदेशातही भाजप आणि समाजवादी पार्टीमध्ये आमने सामने लढत होणार आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी सभा, रॅलींचा जोरदार तयारी केली आहे. या निवडणुकीचा प्रचारासाठी सर्व पक्षाकडून सोशल मीडियाचा वापरही जोरात करण्यात येत आहे.
Paanch Hazar crore ka chanda hai aapki party ke pass ek Photoshop wala toh hire kar lete 😂😂😂 https://t.co/i7AF8jwX0u
— Kunal Kamra (@kunalkamra88) February 15, 2022
यातच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील ट्विटरवर एक फोटो शेअर करत तो इटावाचा असल्याचं म्हटलं. मात्र, या फोटोत समोर दिसणारी गर्दी वेगळ्याच दिशेला हात करत आहे, तर योगी गर्दीच्या डावीकडून हात करताना दिसत आहे. त्यामुळेच हा फोटो एडीट केल्याचा आरोप होतो आहे.
प्रसिद्ध कॉमेडियन कुणाल कामराने देखील रिट्वीट करत या फोटोवरून योगींवर निशाणा साधला आहे.सर्व देशाचे लक्ष वेधून घेतलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसा प्रचार तापत आहे. तसेच योगी त्यांचा या ट्विटमुळे सोशलवर चांगलेच ट्रोल केले जात आहे.