Kota Mahashivratri । देशात आज सर्वत्र महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करण्यात येतोय. मात्र तिकडे कोटामध्ये भगवान शंकराच्या मिरवणुकीत मोठी दुर्घटना घडलीय. भगवान शंकराच्या मिरवणुकीत विजेचा धक्का लागल्याने सुमारे 14 मुले भाजली. सर्व जखमी मुलांना उपचारासाठी एमबीएस रुग्णालयात आणण्यात येत आहे. कुन्हडी थर्मल चौकाजवळ ही घटना घडली.
#WATCH | Rajasthan: Several children were electrocuted during a procession on the occasion of Mahashivratri, in Kota. Further details awaited. pic.twitter.com/F5srBhO9kz
— ANI (@ANI) March 8, 2024
झेंड्याचा तारेला स्पर्श झाल्याने दुर्घटना Kota Mahashivratri ।
प्राप्त माहितीनुसार, कोटा येथील कुन्हडी पोलीस स्टेशन परिसरात महाशिवरात्रीनिमित्तभगवान शंकराची मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणूक सुरु असताना अचानक विजेचा शॉक लागून सर्वत्र गोंधळ निर्माण झाला. यामुळे मिरवणुकीत सहभागी 14 हून अधिक मुले भाजली गेली. हे प्रकरण सागतपुरा येथील काली बस्तीचे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यात्रेदरम्यान अनेक मुलांनी धार्मिक झेंडे हाती घेतले होते. यावेळी ध्वजाचा विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने ही दुर्घटना घडली असल्याचे सांगण्यात येत आहे.
ऊर्जामंत्री मुलांना भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचले Kota Mahashivratri ।
दरम्यान, शंकर भगवानाची मिरवणूक ज्या ठिकाणाहून जात होती तिथून पाणी पसरल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे विद्युत प्रवाह झपाट्याने पसरला. सर्व मुलांना कोटा येथील एमबीएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ऊर्जामंत्री हिरालाल नागर हे जखमी मुलांना भेटण्यासाठी एमबीएस हॉस्पिटलमध्ये पोहोचले आणि त्यांनी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
हेही वाचा
कोटा येथे १७ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार
Kota Student Suicide : ‘मम्मी, पप्पा, मी जेईई करू शकत नाही, मला माफ करा…’; परीक्षेच्या दोन दिवस आधी कोटामध्ये विद्यार्थिनींची आत्महत्या