पुणे : भीमा कोरेगाव प्रकरणातील नऊही आरोपींनी जामीनासाठी केलेला अर्ज पुणे सत्र न्यायलयाने फेटाळला आहे. एल्गार परिषद भरवून जनभावना चिथावल्याच्या आरोपावरून तसेच यातील काही जणांवर नक्षलवाद्यांशी कथित संबंध असल्याच्या आरोपावरून खटला दाखल केला आहे. या आरोपींची नावे : सुरेंद्र गडलिंग, वरवरा राव, सुधा भारद्वाज, वर्नान गोन्सालवीस, अरूण फरेरा , शोमा सेन आणि रोना विल्सन यांनी जामीनासाठी अर्ज केला होता.