पुणे – गेल्या चार ते पाच दिवसांपासून कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. पुढील काही दिवस अशीच स्थिती राहणार आहे. दरम्यान, आगामी दोन दिवस कोकण आणि विदर्भात पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
सध्या बंगालच्या उपसागरात चक्राकार स्थिती आहे. ही स्थिती समुद्र सपाटीपासून 3.1 आणि 5.8 मिलीमीटर उंचीवर आहे, तर बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. त्यामुळे विदर्भ अणि मराठवाड्यातील काही भागांत चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. गुजरात किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र आहे. त्यामुळे कर्नाटक आणि केरळ किनारपट्टीवर असणारे बाष्प महाराष्ट्रकडे सरकून राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.