पुणे : मागील आठवड्यात मुळा नदीला आलेल्या पुराने होळकर पुलावरुन पाणी गेले होते. जवळपास तीन दिवस हा पूल वाहतुकीसाठी बंद होता. पुरासोबत आलेला गाळ, कचरा, जलपर्णी पुलावर अडकून पडली होती. खडकी कॅन्टोमेन्ट बोर्डाने हा कचरा काढण्यासाठी कर्मचारी लावले होते. मात्र हे कर्मचारी तो कचरा पुन्हा नदीतच टाकत आहेत.