कोंढवा : मराठा बांधवाच्या आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देऊन शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कोंढवा खुर्द येथे दी मुस्लीम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ऍड. हाजी गफुर पठाण व मुस्लीम युवक व ज्येष्ठांच्या वतीने एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
एक मराठा,लाख मराठा व आरक्षण मराठा समाजाच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, अशा प्रकारच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. मागील सहा दिवसांपासुन मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. मात्र, यावर राज्य सरकार कोणतीही भुमिका मांडत नाही. राज्य सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा अधिक तीव्र लढा उभारला जाईल, असा इशारा यावेळी गफुर पठाण यांनी दिला.
यावेळी समीर शेख, ओबेद शहा, जावेद शेख, मोहम्मदीन खान, इम्तियाज शेख, नदीम शेख, मुज्जु शेख, संजय लोणकर,बाप्पु मुलाणी, गणेश भोईटे, शहेबाज पंजाबी, राजू आडागळे, इकबाल मुलाणी, शाकीर शेख, नूर शेख, मुनाफ मामू, इम्तियाज तांबोळी, आरिफ शेख, राज अहमद, जावेद पठाण, शाहिद शेख, मुबीन शेख आदि उपस्थित होते.