मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. त्यात खासदार अमोल कोल्हे, वंदना चव्हाण आणि पक्षाच्या महिला विभागाच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांचाही समावेश आहे.
राष्ट्रवादीच्या प्रचाराची धुरा प्रामुख्याने पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या खांद्यावर आहे. त्यांच्याबरोबरच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, अजित पवार, सुप्रिया सुळे, दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, सुनील तटकरे हे पक्षाचे स्टार प्रचारक असतील. नवाब मलिक, माजिद मेमन, जयदेव गायकवाड यांनाही स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान मिळाले आहे.