रेडा- राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व राज्याचे पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर सोमवारी (दि.9) इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत.
इंदापूर येथील शहा संस्कृतिक भवन येथे कार्यकर्ता मेळावा असल्याचे पक्षाचे इंदापूर तालुका संपर्कप्रमुख अण्णा पाटील यांनी सांगितले. या मेळाव्यामध्ये मंत्री जानकर हे विधानसभा निवडणुकीविषयी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असून हा दौरा सध्याच्या इंदापूर तालुक्यातील राजकीय परिस्थितीत महत्त्वाचा मानला जात आहे. मंत्री जानकर हे या मेळाव्यामध्ये काय बोलणार, यामुळे या मेळाव्याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. यावेळी पुण्यश्लोक आहिल्यादेवी शेळी मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतल्ले, राज्याचे प्रदेश उपाध्यक्ष दादासाहेब केसकर, पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष माणिकराव दांगडे पाटील, पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष किरण गोफणे आदींसह राज्य व जिल्हा पातळीवरील पदाधिकारी मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत.