IPL Auction 2026 : कॅमेरून ग्रीनला २५.२ कोटींची बोली, पण मिळणार फक्त १८ कोटी; BCCI चा ‘हा’ नियम कारणीभूत!

KKR buys Cameron Green for Rs 25.2 crore : आयपीएलच्या १९ व्या हंगामासाठी अबू धाबी येथे सुरू असलेल्या लिलावात ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीन याच्यावर अपेक्षेप्रमाणे मोठी बोली लागली आहे. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाने त्याला आपल्या ताफ्यात सामील केले आहे. या लिलावासाठी सर्वाधिक पर्स असलेल्या केकेआरने ग्रीनला आपल्या संघात घेण्यासाठी तब्बल २५ कोटी २० लाख रुपये खर्च केले. मात्र, त्याला फक्त १८ कोटी रुपये मिळणार आहेत, असं का ते जाणून घेऊया.
बीसीसीआयच्या नियमामुळे ग्रीनला मिळणार कमी रक्कम –
विशेष म्हणजे, केकेआरने कॅमेरून ग्रीनवर २ करोड २० लाख रुपयांची बोली लावली असली तरी, त्याला आगामी हंगामासाठी १८ कोटी रुपये इतकीच रक्कम मिळेल. यामागे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (BCCI) नियम कारणीभूत आहे. तो नियम काय आहे? जाणून घेऊया. आयपीएल २०२५ (१९ वा हंगाम) साठी मिनी लिलाव होण्यापूर्वी, बीसीसीआयने काही नवीन नियम लागू केले होते, ज्यामध्ये विदेशी खेळाडूंसाठी ‘जास्तीत जास्त शुल्क’ निश्चित करण्यात आले. या नियमानुसार, विदेशी खेळाडूला १८ कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम मिळू शकत नाही.
💰 INR 25.20 Crore 🤯🤯
The third most expensive player in the history of #TATAIPL auction! 🔨
Cameron Green will play for @KKRiders 💜#TATAIPLAuction pic.twitter.com/c0ErBPWHju
— IndianPremierLeague (@IPL) December 16, 2025
फ्रँचायझींच्या चिंतेमुळे हा नियम तयार करण्यात आला होता. काही विदेशी खेळाडू केवळ जास्त पैसे कमवण्यासाठी मिनी-लिलावात सहभागी होण्याचा प्रयत्न करतात, अशी तक्रार फ्रँचायझींनी केली होती. बीसीसीआयच्या या नियमानुसार, जर एखाद्या विदेशी खेळाडूसाठी १८ कोटी रुपयांपेक्षा जास्त बोली लागली, तर अतिरिक्त रक्कम खेळाडूंच्या कल्याणासाठी वापरली जाईल.
७.२० कोटी रुपयांचे ‘नुकसान’ –
मागील हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू (RCB) चा भाग असलेला कॅमेरून ग्रीन आता केकेआरच्या जर्सीमध्ये दिसेल. केकेआरच्याच्या पर्समधून २५ करोड २० लाख रुपये कमी झाले असले तरी, ग्रीनला मात्र १८ कोटी रुपयेच मिळतील. त्यामुळे त्याला ७ कोटी २० लाख रुपयांचे नुकसान होणार आहे. असे जरी असले तरी तो यंदाच्या हंगामात सर्वात महागडा खेळाडू ठरलेला आहे.
हेही वाचा – Lionel Messi: लिओनेल मेस्सीशी हस्तांदोलन करण्यासाठी 1 कोटी रुपये खर्च; मोठी माहिती समोर
त्याबरोबर आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा परदेशी खेळाडू ठरला आहे. कॅमेरुन ग्रीनच्या आयपीएलमधील कामगिरीवर नजर टाकल्यास, त्याने आतापर्यंत २९ सामने खेळले आहेत. फलंदाजीत त्याने ४१.५९ च्या सरासरीने ७०७ धावा केल्या आहेत, तर गोलंदाजीत ४१.५ च्या सरासरीने १६ विकेट्स घेतल्या आहेत.





