Sourav Ganguly Questions : ‘ते दोन खेळाडू कुठे आहेत?’, वेलिंग्टन कसोटी ड्रॉ होताच संतापला सौरव गांगुली! संघ निवडीवर उपस्थित केले सवाल
Sourav Ganguly Questions : भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना अनिर्णित राखला. सामन्यानंतर, माजी कर्णधार सौरव गांगुलीने संघ निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

Sourav Ganguly questions Team India’s selection : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांना २० विकेट्स घेता न आल्याने बेसिन रिझर्व्ह मैदानावरील सामना अनिर्णित राहिला. पहिल्या डावात ३५२ धावांनी पिछाडीवर असलेल्या यजमान किवींनी दुसऱ्या डावात १२० षटकांत ५ बाद २३९ धावा केल्या. पाचव्या दिवशी १५ षटके शिल्लक असतानाच कर्णधार शुबमन गिलने सामना ड्रॉ करण्यास संमती दिली. यानंतर माजी कर्णधार सौरव गांगुलीने बीसीसीआयला महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे.
सौरव गांगुली संघ निवडीवर तीव्र नाराज –
या अनिर्णित निकालानंतर माजी भारतीय कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी संघ निवडीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. परदेशी भूमीवर खेळपट्टी सपाट झाल्यावर विकेट्स घेण्यासाठी दर्जेदार फिरकीपटूची गरज असते. भारताने केवळ अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरला संधी दिली, यावरून गांगुलींनी कुलदीप यादव आणि मानव सुथार कुठे आहेत, असा थेट सवाल उपस्थित केला.
गांगुलींनी सोशल मीडियावरून मांडली परखड भूमिका –
India has been brilliant this series .. white ball and now red ball .. the batting application looked super .. but they must understand to win test matches away a genuine spinner is a must on pitches which get flat with time ..u have to play one in test cricket .. Washington can play as an allrounder ..@bcci where is Kuldeep or Manav sutar ?
— Sourav Ganguly (@SGanguly99) November 23, 2026
भारतीय क्रिकेटमधील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक असलेल्या गांगुलींनी ‘एक्स’वर लिहिले की, “भारताची पांढऱ्या आणि लाल चेंडूच्या क्रिकेमध्ये फलंदाजी अतिशय अप्रतिम राहिली आहे. मात्र, कालांतराने सपाट होणाऱ्या खेळपट्ट्यांवर कसोटी जिंकण्यासाठी प्रमुख फिरकीपटू अत्यंत आवश्यक आहे. वॉशिंग्टन सुंदर अष्टपैलू म्हणून खेळू शकतो, पण कसोटीत एक प्रमुख फिरकीपटू खेळवावाच लागेल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
वॉशिंग्टन सुंदरला ५५ षटकांत अवघी एक विकेट –
A draw it is in the Wellington Test.
Both teams share the honours after a hard-fought contest.
#TeamIndia will now aim to win the series in the 2nd #NZvIND Test in Christchurch 🇮🇳
Scorecard ▶️ https://t.co/SaMcNXtAVG https://t.co/GF8A2ALHbD
— BCCI (@BCCI) November 23, 2026
वॉशिंग्टन सुंदरने पहिल्या डावात २० षटकांत एकही विकेट्स घेतली नाही, तर दुसऱ्या डावात ३५ षटकांत केवळ डेव्हॉन कॉनवेला बाद केले. दुसरीकडे, भारताच्या पहिल्या डावात किवी फिरकीपटू ग्लेन फिलिप्स आणि रचिन रवींद्र यांनी मिळून पाच गडी बाद केले. विशेष म्हणजे, कुलदीप यादव आणि मानव सुथार यांना या मालिकेसाठी संघातून मुक्त करण्यात आले होते.
कुलदीप यादव ९ वर्षांत खेळलाय फक्त १९ कसोटी –
२०१७ मध्ये कसोटी पदार्पण करणाऱ्या ३१ वर्षीय कुलदीप यादवला नऊ वर्षांच्या कारकिर्दीत केवळ १९ कसोटी सामने खेळायला मिळाले असून, त्यात त्याने ८० विकेट्स घेतल्या आहेत. आशियाबाहेर तो फक्त दोनच कसोटी खेळला आहे. तिन्ही फॉरमॅटमध्ये पाच विकेट्स घेणारा तो एकमेव भारतीय फिरकीपटू असून, जगात केवळ पाचच पुरुष फिरकीपटूंना ही कमाल करता आली आहे.





