Shubman Gill Explains : “तो माझा खूप चांगला मित्र आहे, पण…”, मोहम्मद सिराजला प्लेइंग ११ मधून बाहेर ठेवण्यावर कर्णधार गिलने सोडलं मौन!
Shubman Gill Explains : न्यूझीलंडविरुद्ध वेलिंग्टन येथे होणाऱ्या कसोटी सामन्यासाठी भारताच्या अंतिम ११ खेळाडूंमध्ये मोहम्मद सिराजचा समावेश नव्हता. कर्णधार शुबमन गिलने या ३२ वर्षीय खेळाडूला वगळण्याच्या निर्णयाचे समर्थन केले.

Shubman Gill Explains Why Mohammed Siraj Dropped : ब्रिस्बेनपासून लॉर्ड्सपर्यंत भारताच्या ऐतिहासिक विजयांत मोलाची भूमिका बजावणारा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला न्यूझीलंडविरुद्धच्या वेलिंग्टन कसोटीतून वगळण्यात आले होते. भारताने या सामन्यात जसप्रीत बुमराह, प्रसिध कृष्णा, अंशुल कंबोज आणि आकाश दीप या चार वेगवान गोलंदाजांना संधी दिली, पण सिराजला स्थान मिळाले नाही. पाच दिवस चाललेल्या या चर्चेवर अखेर सामना अनिर्णित राहिल्यानंतर कर्णधार शुबमन गिलने आपली बाजू मांडली आहे.
चांगला मित्र असल्याने निर्णय कठीण होता: गिल
पत्रकार परिषदेत बोलताना शुबमन गिल म्हणाला की, “आम्ही या सामन्यासाठी आमचे सर्वोत्तम गोलंदाजी आक्रमण निवडले होते. सिराज हा उत्कृष्ट गोलंदाज असून त्याने भारतासाठी चमकदार कामगिरी केली आहे. पण या सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो माझा खूप चांगला मित्र आहे. आम्ही एकत्र पदार्पण केले होते आणि त्याआधीपासूनच आमची मैत्री आहे. त्यामुळे त्याला संघाबाहेर ठेवणे माझ्यासाठी अत्यंत कठीण निर्णय होता.”
सामन्यापूर्वीच सिराजशी केली होती सविस्तर चर्चा –
Shubman Gill said, “Mohammed Siraj is a really good friend and dropping him was a really tough call. I had a chat with him before the Test explaining him, and he understood that. Every player sees a phase where they’re not at their peak, we picked on current form”. https://t.co/seJ26HAoJi
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 23, 2026
संघ निवडताना कोणत्या गोलंदाजाचा फॉर्म चांगला आहे आणि कोण सर्वोत्तम गोलंदाजी करत आहे, हे पाहणे गरजेचे असते, असे गिलने स्पष्ट केले. तो म्हणाला की, “या सामन्यात तो खेळणार नाही. याबाबत माझी त्याच्याशी आधीच चर्चा झाली होती. तो या निर्णयाशी सहमत होता की नाही हे मला माहीत नाही, परंतु दुसऱ्या खेळाडूला निवडण्यामागचे तर्क त्याने नक्कीच समजून घेतले.”
सिराजच्या दमदार पुनरागमनावर कर्णधाराला पूर्ण विश्वास –
Shubman Gill on dropping Siraj 🗣️
#Cricket #NZvsIND https://t.co/We5mDfRmkB
— CREX (@Crex_live) November 23, 2026
कर्णधार गिल पुढे म्हणाला, “प्रत्येक खेळाडूच्या कारकिर्दीत असा टप्पा येतो, जेव्हा तो आपल्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये नसतो, असे गिलने नमूद केले. सिराजला ही गोष्ट चांगलीच ठाऊक आहे. जोपर्यंत एखादा खेळाडू मेहनत घेण्यास आणि पुनरागमन करण्यास तयार असतो, तोपर्यंत ते संघासाठी सकारात्मक लक्षण असते. सिराज अशाच खेळाडूंपैकी एक असून तो लवकरच दमदार पुनरागमन करून संघासाठी सर्वोत्तम कामगिरी करेल”, असा विश्वास गिलने व्यक्त केला.





