Vaibhav Sooryavanshi : गोलंदाजांची अक्षरशः कत्तल! 52 चेंडूत द्विशतक ठोकत भारताच्या ‘या’ युवा फलंदाजाचा मोठा विश्वविक्रम
एशिया कप रायझिंग स्टार स्पर्धेत युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Sooryavanshi) चौकार आणि षटकारांची अशी काही आतषबाजी केली की, संपूर्ण क्रिकेट विश्व थक्क होऊन गेले आहे.

Vaibhav Sooryavanshi : एशिया कप रायझिंग स्टार स्पर्धेत युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Sooryavanshi) चौकार आणि षटकारांची अशी काही आतषबाजी केली की, संपूर्ण क्रिकेट विश्व थक्क होऊन गेले आहे. युएईविरुद्धच्या सामन्यात आव्हानाचा पाठलाग करताना वैभवने पहिल्याच चेंडूपासून आक्रमक पवित्रा स्वीकारला आणि विरोधी गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली.
पहिल्या षटकात तीन षटकार, दुसऱ्या षटकात दोन षटकार व एक चौकार आणि तिसऱ्या षटकात षटकारांची हॅट्रिक करत त्याने आपले इरादे स्पष्ट केले. चौथ्या षटकात अभिषेक बाद झाला तरी वैभवचा तडाखा थांबला नाही; त्याने चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या षटकातही षटकारांचा पाऊस पाडत अवघ्या १६ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.
पॉवरप्ले संपल्यानंतरही वैभवची (Vaibhav Sooryavanshi) ही वादळी खेळी सुरूच राहिली. त्याने पुढच्याच षटकात षटकार, चौकार आणि पुन्हा षटकार ठोकत ६.३ व्या षटकात अवघ्या २८ चेंडूत शतकाला गवसणी घातली. लिस्ट ए क्रिकेटच्या इतिहासातील हे सर्वात वेगवान शतक ठरले आहे.
या खेळीदरम्यान युएईच्या यष्टीरक्षकाने वैभवला स्टंपिंग करण्याची एक सोपी संधी गमावली आणि हीच चूक त्यांच्या चांगलीच अंगलट आली. शतकानंतर वैभव अधिकच आक्रमक झाला आणि त्याने षटकारांचा वेग आणखी वाढवत अवघ्या ५२ चेंडूत ऐतिहासिक द्विशतक पूर्ण केले.
यापूर्वी लिस्ट ए प्रकारात सर्वात वेगवान द्विशतकाचा विक्रम १०२ चेंडूंचा होता, जो वैभवने निम्म्या चेंडूतच मोडीत काढला. आपल्या या २०४ धावांच्या अद्भुत आणि अविश्वसनीय खेळीत वैभवने तब्बल २८ षटकार चोपून एक नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला. युएईच्या गोलंदाजांना पूर्णपणे हताश आणि निष्प्रभ करत भारताचा विजय पक्का केल्यानंतरच वैभव (Vaibhav Sooryavanshi) तंबूत परतला.






