Abhishek Sharma Confronts : वैभवला डिवचताच भडकला अभिषेक! थेट पाकिस्तानी गोलंदाजाच्या अंगावर गेला धावून; VIDEO होतोय व्हायरल
Abhishek Sharma Confronts : वैभव सूर्यवंशी बाद झाल्यानंतर त्याला स्लेजिंग करणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूला अभिषेक शर्माने शांत केले.

Abhishek Sharma confronts Pakistan spinner Sufiyan Muqeem : आशिया कप रायझिंग स्टार्स २०२६ स्पर्धेत रविवारी झालेल्या भारत-अ आणि पाकिस्तान-अ यांच्यातील हाय-व्होल्टेज सामन्यात मैदानावर प्रचंड तणाव पाहायला मिळाला. दोन्ही संघांतील खेळाडूंमध्ये अनेकदा शाब्दिक चकमकी उडाल्या आणि खेळाडू एकमेकांच्या अंगावर धावून गेले. याच सामन्यात युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी बाद झाल्यानंतरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, त्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
वैभव सूर्यवंशी स्वस्तात बाद अन् सुफियानची कुरापत –
पाकिस्तानने दिलेल्या ३१४ धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात निराशाजनक झाली. डावातील चौथ्या षटकात मोहम्मद इम्रान रंधावाच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या नादात वैभव सूर्यवंशी अवघ्या ११ धावांवर झेलबाद झाला. तो पॅव्हेलियनकडे परतत असताना पाकिस्तानचा फिरकीपटू सुफियान मुकीमने त्याला डिवचण्याचा प्रयत्न केला, मात्र वैभवने कोणतेही प्रत्युत्तर न देता शांतपणे पुढे जाणे पसंत केले.
अभिषेक शर्माने सुफियान मुकीमला सुनावले खडेबोल –
When Vaibhav Suryavanshi got out, Pakistani players came up to him and started sledging. But Abhishek immediately stepped in, confronted the Pakistani players, and made sure Vaibhav could walk back peacefully.❤️🇮🇳 https://t.co/Ncsz4Ni8jN
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) November 23, 2026
सुफियान मुकीमचे हे असभ्य वर्तन दुसऱ्या टोकाला उभ्या असलेल्या अभिषेक शर्माला अजिबात आवडले नाही. युवा सहकाऱ्याला डिवचल्याचे पाहताच अभिषेक रागाने थेट धावत पुढे आला आणि त्याने सुफियानला चांगलेच खडेबोल सुनावले. मैदानावर घडलेला हा संपूर्ण प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला असून, अभिषेकच्या या आक्रमक पवित्र्याचा व्हिडीओ सध्या चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.
पाकिस्तानचा ३१३ धावांचा डोंगर, अभिषेकची झुंजार खेळी –
Footage That Was Missing From the Camera 😱
During the India A vs Pakistan A game, this footage wasn’t shown on camera. But why?
When Vaibhav Suryavanshi got out, the camera showed him staring at the Pakistani players. However, it didn’t show what had happened behind the scenes.
In reality, the Pakistani players had messed with Abhishek Sharma, which is why Suryavanshi was staring at them. 😶
— Mukku (@Cric_Mukku) November 23, 2026
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तान-अ संघाने ३१३ धावांचा डोंगर उभारला. त्यात हसन नवाोझ सर्वाधिक ७९, माझसदाकतने ५९, तर फरहान युसूफने ५६ धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरात वैभव (११) आणि आयुष बदोनी (०) लवकर बाद झाल्यानंतर अभिषेक शर्माने चौकार-षटकारांची आतषबाजी करत वेगवान ७० धावांची खेळी साकारून भारतीय डावाला आकार दिला.
तिलक वर्माचे शतक व्यर्थ, भारताचा ४८ धावांनी पराभव –
मधल्या षटकांत कर्णधार तिलक वर्मा आणि शाहबाज अहमद यांनी संयमी भागीदारी रचत भारताच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. तिलकने शंभरहून कमी स्ट्राईक रेटने फलंदाजी करत एक बाजू लावून धरली आणि शानदार शतक झळकावले. मात्र, शाहबाज बाद होताच ही जोडी फुटल्याने सामना भारताच्या हातून निसटला आणि टीम इंडियाला ४८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.





