Sanju Samson : केकेआर-राजस्थान रॉयल्समध्ये मोठी डील? सॅमसनच्या बदल्यात ‘या’ दोन खेळाडूंचा दिला पर्याय

केकेआरने अंगकृष रघुवंशीला 3 कोटी आणि रमनदीप सिंगला 4 कोटी रुपयांना आपल्या संघात सामील करून घेतले आहे. जर राजस्थान रॉयल्स एका खेळाडूच्या बदल्यात सॅमसनला देण्यास तयार झाले, तर केकेआरला 14 ते 15 कोटी रुपये अतिरिक्त द्यावे लागतील, कारण संजू सॅमसनची आयपीएलमधील किंमत 18 कोटी रुपये आहे.
राजस्थान रॉयल्ससमोर दुसरा पर्याय –
🚨 𝑹𝑬𝑷𝑶𝑹𝑻𝑺 🚨
KKR has reportedly proposed trading promising batter Angkrish Raghuvanshi or all-rounder Ramandeep Singh for RR skipper Sanju Samson! 🩷🔄💜
If the player swap doesn’t materialise, an all-cash deal could be on the cards too! 🏏#KKR #RR #SanjuSamson #IPL… pic.twitter.com/7tSEcLBPZy
— Sportskeeda (@Sportskeeda) August 15, 2025
वृत्तानुसार, राजस्थान रॉयल्ससमोर चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) सोबत करार करण्याचा पर्यायही आहे. सीएसके संजू सॅमसनला एमएस धोनीचा उत्तराधिकारी म्हणून पाहत आहे. परंतु, राजस्थान रॉयल्सला सीएसकेकडून कर्णधार ऋतुराज गायकवाड, ज्येष्ठ अष्टपैलू रवींद्र जडेजा किंवा मधल्या फळीतील स्टार फलंदाज शिवम दुबे यापैकी एक खेळाडू हवा आहे. मात्र, सीएसकेने यावर अद्याप सहमती दर्शवलेली नाही.
संजू सॅमसन केकेआरसाठी योग्य का?
संजू सॅमसन केकेआरसाठी एक आदर्श पर्याय आहे. सलामीवीर फलंदाज, यष्टीरक्षक आणि कर्णधार अशा तिन्ही भूमिकांसाठी तो उपयुक्त ठरू शकतो. केकेआरला गेल्या काही काळापासून यष्टीरक्षक-फलंदाजाची कमतरता जाणवत आहे, जी सॅमसनच्या समावेशाने भरून निघू शकते.
हेही वाचा – Irfan Pathan : “तू कब से बाप बन गया?”, गैरवर्तन करणाऱ्या आफ्रिदीला इरफान पठाणने सर्वांसमोर लगावली होती चपराक
राजस्थान रॉयल्सची युवा खेळाडूंवर भिस्त –
राजस्थान रॉयल्स नेहमीच आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची क्षमता असलेल्या युवा खेळाडूंना आपल्या संघात सामील करून घेण्यास प्राधान्य देते. अंगकृष आणि रमनदीप हे दोन्ही खेळाडू या निकषांवर योग्य ठरतात. मात्र, गेल्या हंगामात राजस्थानला खालच्या फळीतील फलंदाजांकडून जलद आणि मोठ्या प्रमाणात धावा करण्यात अडचणी आल्या होत्या. रमनदीप सिंग हा या समस्येवर उपाय ठरू शकतो, कारण तो वेगाने धावा करू शकतो.





