पिंपळे गुरव – पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी कार्याध्यक्ष शाम जगताप यांनी प्रभागातील महिलांसाठी न्यू होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित केला होता. पिंपळे गुरव येथील सृष्टी चौक येथे हा कार्यक्रम घेण्यात आला. महिलांनी मोठ्या प्रमाणावर बक्षीसे मिळविली.
न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमात प्रांजल अजय कांबळे यांनी प्रथम क्रमांक पटकावत टीव्ही जिंकला. तर संध्या हेमंत हिमगिरे यांनी द्वितीय क्रमांक मिळवत फ्रिज, तसेच प्रियंका श्रीकांत महाले यांनी तिसरा क्रमांक पटकावत पिठाची गिरणी जिंकली. अभिनेते क्रांती नाना मळेगावकर यांच्या न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या वेळी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, अभिनेत्री शीतल ढेकळे, ताज मिस इंडिया 2021 प्रेसिजा वंजारी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष संजोग वाघिरे, माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल काटे, माजी नगरसेवक राहुल कलाटे, मयूर कलाटे, नवनाथ जगताप, राजेंद्र जगताप, सांगवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील टोनपे, पोलीस उपनिरीक्षक अशोक जगताप, युवा नेते तानाजी जवळकर, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, माजी नगरसेवक अतुल शितोळे, पिंपरी चिंचवड महिलाध्यक्ष कविता आल्हाट, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते फजल शेख, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष विशाल वाकडकर, पवन साळुंखे, माजी नगरसेविका स्वाती काटे, मीना शितोळे, माजी नगरसेविका चंदा लोखंडे, माजी नगरसेविका सुषमा तनपुरे, महिला शहर कार्याध्यक्ष उज्ज्वला ढोरे, सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी जगताप, तृप्ती जवळकर तसेच बहुसंख्येने महिला व शामभाऊ जगताप मित्र परिवार उपस्थित होते.