लोणी धामणी – धामणी (ता. धामणी) येथील खंडोबा मंदिर 31 मार्चपर्यंत बंद राहाणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. कुलस्वामी श्री म्हाळसाकांत खंडोबा मंदिरात सकाळी देवास अभिषेक व आरती करण्यात आल्याचे पुजारी शांताराम भगत आणि सुभाष तांबे यांनी सांगितले. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी भाविकांनी 31 मार्चपर्यंत दर्शनासाठी येऊ नये, असे ग्रामस्थांनी यावेळी आवाहन केले.
खंडोबा मंदिरातील नगारखाना कमानीत असणारी हेगडे प्रधानाची दगडी मूर्ती खराब (भग्न) झाल्याने गावडेवाडी ((तालुका आंबेगाव) येथील नवी मुंबईचे माजी उपमहापौर व नगरसेवक अशोक अंकुश गावडे यांनी जयपूर (राजस्थान) येथून हेगडे प्रधानाची संगमरवरी आकर्षक मूर्ती नुकतीच खंडोबा मंदिरात ग्रामस्थांच्या स्वाधीन केली आहे. हेगडे प्रधान मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रम 6 मार्चला करण्यात येणार होता; परंतु करोनामुळे प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे ग्रामस्थांनी यावेळी सांगितले.