पिरंगुट- येथे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून संपूर्ण गावात सोडियम हायपोक्लोराइड औषधाची ग्रामपंचायतीच्या वतीने विविध भागात फवारणी केली असल्याची माहिती सरपंच चांगदेव पवळे आणि ग्रामविकास अधिकारी डी. डी. भोजणे यांनी दिली. सध्या जगभर करोना रोगाने धुमाकूळ घातला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून ही औषध फवारणी केली जात आहे.
गावातील मुकाईवाडी, मतेवाडी, सावकारवाडी, गोळेआळी, पवळेआळी, गणेशनगर, पिरंगुट बस स्थानक परिसर, बालाजीनगर, लक्ष्मीनगर, कुंभारवाडा आदी परिसरात ही फवारणी झाली आहे. त्याचबरोबर परिसरात असलेल्या जिल्हा परिषद शाळा, सरकारी शाळा, खाजगी शाळा, सार्वजनिक ठिकाणे याठिकाणी ही फवारणी केली आहे.
उर्वरीत सर्व भागात खबरदारीचा उपाय म्हणून पुन्हा फवारणी केली जाणार आहे. स्वतःची काळजी घ्या. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.