kerala weather – भारताच्या हवामान विभागाने देशाच्या दक्षिणेकडील हवामानाच्या परिस्थितीमुळे पुढील काही दिवस केरळमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
दक्षिण तामिळनाडू आणि शेजारील भागांवर चक्रीवादळ पसरले असून ते पुढील तीन दिवसांत पश्चिम-उत्तर पश्चिमेकडे आग्नेय आणि लगतच्या पूर्व-मध्य अरबी समुद्राकडे सरकण्याची शक्यता आहे.
त्यामुळे केरळ आणि दक्षिण द्वीपकल्पात पुढील सात दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यातील पहिले तीन दिवस या पावसाची तीव्रता मुसळधार स्वरूपाची असेल.
त्यामुळे केरळातील पठाणमथिट्टा, इडुक्की आणि मलप्पुरम जिल्ह्यांमध्ये 5 नोव्हेंबरसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला हाता. जेव्हा पावसाचे प्रमाण 6 ते 20 सेमीच्या दरम्यान असण्याची शक्यता असते त्यावेळी त्या भागाला ऑरेंज ऍलर्ट दिला जातो.