पुणे -“महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना पाठिंबा वाढत आहे. महाविकास आघाडीसाठी अत्यंत चांगले वातावरण आहे. ही निवडणूक महापालिका निवडणुकीसाठी निर्णायक राहील,’ असा दावा माजी गृहराज्यमंत्री सतेज (बंटी) पाटील यांनी केला.
महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ कॉंग्रेस भवन येथे शनिवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. यावेळी कॉंग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी राज्यमंत्री रमेश बागवे, माजी आमदार दीप्ती चवधरी उपस्थित होते. कसब्यातील सुजान आणि सुशिक्षित मतदार आणि कॉंग्रेसचे मित्र पक्षदेखील ताकदीने धंगेकरांच्या मागे उभे आहेत, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला. आयोगाच्या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जनतेत सहानुभूती वाढली आहे. आदित्य ठाकरे हेदेखील राज्यभर दौरे करत आहेत. त्यांना जनतेचा चांगला पाठिंबा मिळत आहे. याचा फायदा आघाडीला होईल, असेही पाटील म्हणाले.