बुधवारी कार्तिक आर्यन सारा अली खानच्या घरी गेला होता. सारा अली खानच्या घरातून बाहेर पडताना पार्किंगमध्ये असताना कार्तिक आर्यनला काही सिनेफोटोग्राफर्सने पकडले. त्याचे हे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल व्हायला वेळ लागला नाही. मात्र समोर कॅमेरे घेतलेले फोटोग्राफर्स बघून कार्तिक आर्यनने चक्क आपला चेहराच लपवला. मात्र तशाही अवस्थेत फोटो “क्लिक’ झालेच. त्याला साराच्या घरी गेलेले उघड होऊ द्यायचे नव्हते का ? का तो मिडीयावाल्यांपासून काही लपवू इच्छित होता ? हे समजू शकलेले नाही.
मात्र त्याने कॅमेरामनपासून आपला चेहरा का लपवला, हे समजू शकलेले नाही. साराकडे आला होता, तेंव्हा तो अगदी साध्या कपड्यांमध्ये आला होता. कारमध्ये बसल्यावर त्याने हूडने आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला होता. एवढेच नव्हे तर कारमध्ये बसल्यावर त्याने पटकन काळा गॉगल घातला, खिडकीच्या काचेवर त्याने हात ठेवून स्वतःचा फोटो काढू न देण्याचा आटापिटा तो करत होता. सारा आणि कार्तिक सध्या इम्तियाझ अलीच्या सिनेमात एकत्र काम करत आहेत. याच दरम्यान यांची डेटिंगचीही न्यूज व्हायरल झाली होती.