दीपिकाच्या बास्केटबॉल स्कीलने रणवीर इंप्रेस

दीपिका पदुकोणने आपल्या बास्केटबॉल खेळण्याच्या स्कीलने नवरदेव रणवीर सिंहला भलतेच इंप्रेस केले आहे. मंगळवारी दीपिकाने आपला एक व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केला. त्या व्हिडीओमध्ये बास्केटबॉलचा चेंडू बास्केटमध्ये टाकताना दीपिका दिसते आहे. ती बास्केटबॉलच्या कोर्टवर एकटीच खेळत होती. व्हिडीओ “स्लो मोशन’मध्ये शूट केला गेला आहे. “काम करणे आणि न खेळणे … यामुळे तुम्हाला प्रवाह मिळतो’ असे या व्हिडीओचे शिर्षक आहे.

रणवीर सिंहने आपल्या प्रिय पत्नीच्या या व्हिडीओखाली एकाच शब्दात कॉमेंट केले आहे. “बॅलिन ‘ असे त्याने म्हटले आहे. इन्स्टाग्रामवरच्या या व्हिडीओला आतापर्यंत 30 लाखांपेक्षा अधिक प्रेक्षकांनी बघितले आहे आणि 5 हजारापेक्षा अधिक लोकांनी त्यावर कॉमेंटही केले आहे. बहुतेक लोकांनी दीपिकाच्या फिटनेसचे आणि स्पोर्टिंग कल्चर जपण्याचे कौतुक केले आहे. दीपिकाचे वडील प्रकाश पदुकोण हे भारताचे आघाडीचे बॅडमिटनपटू होते. त्यामुळे क्रीडा क्षेत्राशी संबंधित पोषक वातावरण तिला लहानपणापासूनच मिळाले आहे. दुसरीकडे ती सध्या “छपाक’च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे आणि रणवीरही “83’मध्ये क्रिकेटपटू कपिल देव यांचा रोल साकारतो आहे.

https://www.instagram.com/p/Bw4GYAjgtJ2/

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.