कार्तिक आर्यन शनिवारी चक्क रस्त्यावर चायनीजचा आनंद घेताना दिसला. ते देखील आपल्या महागड्या लॅंबोर्गिनी कारच्या बॉनेटवर प्लेट ठेवून तो खात उभा होता. यावेळी अनेकजण येता जाताना त्याच्याकडे बघत होते. काही जण त्याच्याबरोबर सेल्फी देखील घेत होते. कार्तिक चायनीजचा आनंद घेतानाच त्यांना पोज देत होता.
मात्र, कार्तिक आर्यनचे कोणाकडेही लक्ष नव्हते. एखादा सेलिब्रिटी अशाप्रकारे सगळ्यांमध्ये सहज मिसळत असल्याचे फारच कमी वेळा बघायला मिळते. वर्क फ्रंटच्याबाबतीत कार्तिक आर्यनकडे खूप सिनेमे आहेत. “भूलभुलय्या’च्या सिक्वेलमध्ये तो दिसणार आहे.
याशिवाय शशांक घोषचा “फ्रेन्डी’ हंसल मेहताचा “कॅप्टन इंडिया’ आणि ‘शहजादा”मध्येही कार्तिक दिसणार आहे. याशिवाय आगामी “धमाका’मध्ये तो नवोदित अँकर अर्जुन त्रिपाठीच्या रोलमध्ये दिसणार आहे.
त्या सिनेमात त्याच्यावर दहशतवादी घटनांच्या वार्तांकनाची जबाबदारी असणार आहे. या सगळ्या सिनेमांच्या गडबडीत त्याला कदाचित डिनर करायला वेळच मिळाला नसेल. म्हणून चायनीजच्या गाडीवर खायची वेळ त्याच्यावर आली असावी.