पुणे – श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिम्मित माॅडेल काॅलनीतील केदारनाथ मंदीर येथे कारसेवकांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना तसेच अयोध्येतील रामलल्ला प्राणप्रतिष्ठापणा सोहळा पाहताना कार सेवकांना आनंदाश्रू अनावर झाले.
यावेळी माॅडेल काॅलनीतील उपस्थित रामभक्तही भावूक झाले. भाजप पर्यावरण विभागाचे शहर अध्यक्ष संदीप काळे तसेच अखिल माॅडेल काॅलनी संघर्ष मित्रमंडळाच्या वतीने श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिम्मित केदारनाथ मंदीर तसेच संत ज्ञानेश्वर महाराज पादुक मंदिर परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
सकाळी ११ वाजता अयोध्येतील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केदारनाथ मंदीराच्या आवारात करण्यात आले. यावेली कार सेवकांचा सन्मान करण्यात आला त्यात हरिष अनगोळकर, प्रसाद कुलकर्णी, अभय सामंत, मजूंश्री जोशी, राजीव जोशी, राजेश मोहोळ, नरेंद्र ढमढेरे, राजेश कुलकर्णी, श्रीकांत जोशी यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
सायंकाळी केदारनाथ मंदीरात नितीन मयेकर यांनी रामभक्तीपर गिते सादर केले. तर अश्विनी मेहेर यांनी कथ्थक नृत्यातून रामकथा सादर केली. या नंतर मंदीर परिसरात दिपोत्सव करण्यात आले. तर संत ज्ञानेश्वर महाराज पादुक मंदिरात दिपोत्सव व आरती करण्यात आली व नागरिकांना लाडूचे वाटप करण्यात आले.
संघर्ष मित्र मंडळ महेश हिंगाडे, अमित धुमाळ, सचिन भोसले, सुरज शिंदे, संदीप शेळके, किरण शेडगे, सुरज धुमाळ, यांच्यासह कुणाल भगणे, रोहीत शेळके, कल्पेश मोरे, हर्षाली शेळके, मंगेश भिवरे, योगेश खोले यांच्यासह कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन केले.