- नारीशक्तीने कर्जत पंचायत समितीला दिले निवेदन
कर्जत : कर्जत तालुक्यामध्ये करोना बाधितांची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कुठे तरी हे रुग्ण कमी झाले पाहिजे म्हणून कर्जत तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमधील सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक आणि कर्मचाऱ्यांची करोना चाचणी झाली पाहिजे, अशी मागणी नारीशक्तीने निवेदनाद्वारे पंचायत समितीला केली आहे.
पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सुनील अहिरे यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले. या वेळी स्वीटी बार्शी, वर्षा डेरवणकर आणि ज्योती जाधव उपस्थित होत्या. करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. ते कमी होण्याचे नाव घेतले जात, त्यात काहीजण आमची प्रतिकारशक्ती जास्त आहे, त्यामुळे आम्हाला काय होणार नाही, असे म्हणत शासकीय कार्यालयात अथवा खुलेआम तोंडाला मास्क न लावता फिरत आहेत.
त्यामुळे नकळत अशा व्यक्तींमुळे करोनाचा संसर्ग वाढत आहे. तसेच काही सरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांना करोनाचे लक्षण असूनही डॉक्टरांकडून उपचार न घेता घरबसल्या घरगुती उपचार करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशाने करोना नष्ट होण्याऐवजी वाढत आहे. हे रोखण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींमधील कर्मचाऱ्यांची करोना टेस्ट झाली पाहिजे.
कर्जत तालुक्यात एकूण 53 ग्रामपंचायत आहे. तालुक्याशी असलेल्या पंचायत समितीमध्ये कामानिमित्त दररोज उठबस सुरू असते. अशाने एकमेकांच्या संपर्कात येऊन करोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्याचबरोबर प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये समावेश असलेल्या गावातील ग्रामस्थांचीही “कोविड टेस्ट’ होणे गरजेचे आहे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
पंचायत समितीच्या वतीने प्रत्येक ग्रामसेवकांची कोवीड टेस्ट करून घेतली पाहिजे, असे सूचना दिल्या आहेत. तसेच लवकर सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी ही करून घेणे गरजेचे आहे. यासाठी सूचना करू त्याप्रमाणे सर्व ग्रामपंचायतीने सहकार्य करणे अपेक्षित आहे.
– सुनील अहिरे, विस्तार अधिकरी, पंचायत समिती.कर्जतमध्ये करोना बाधितांची संख्या मोठी आहे. परंतु रुग्णालयात जाऊन चाचणी करण्याचे फारसे धाडस दाखवीत नाहीत, त्यामुळे एका व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंबाना आणि संपर्कात येणाऱ्या व्यक्तीला करोनाचे लागण होते.
– स्वीटी बार्शी, सामाजिक कार्यकर्त्या.एकीकडे प्रशासन सक्तीने नियम करीत आहे, तर दुसरीकडे अधिकारीच नियमांकडे दुर्लक्ष करीत आहेत. तर सर्वसामान्य व्यक्तीकडून का अपेक्षा केले जाते. नियम सर्वांना लागू केले पाहिजे. प्रत्येकाची करोना पाहणी केली पाहिजे.
– वर्षा डेरवणकर, गृहिणी.