शिक्रापूर (पुणे) – येथील एका करोनाबाधित मृत महिलेच्या घरातील पाच जणांना करोनाची बाधा झाली आहे, अशी माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शिंदे व तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा घोरपडे यांनी दिली.
येथील एका करोनाबाधित महिलेचा 30 ऑगस्ट रोजी करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांनतर आरोग्य विभागाच्या वतीने महिलेच्या घरातील दहा जणांची तपासणी करण्यात आली होती. त्या दहा जणांचा करोना अहवाल प्राप्त झाला असून दहा जणांपैकी पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. एकाच घरातील पाचजण बाधित झाले असल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पॉझिटिव्ह आलेल्या पाच जणांना मलठण येथील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.