मुंबई – अभिनेत्री करिश्मा तन्ना (karishma tanna) टेलिव्हिजनवरील एक स्टायलिश अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर करिश्मा चांगलीच सक्रिय असते. ती सोशलवर नेहमीच आपले वेगळ्या अंदाजात फोटो शेअर करत असते.
करिश्मा तन्नाने (karishma tanna) नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले असून, यामध्ये करिश्मा अतिशय सुंदर आणि ग्लॅमर्स दिसत आहे. करिश्माचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.
सध्या गणेशोत्सवाच्या (ganpati) शुभमुहूर्तावर सर्वत्र आनंदाचे आणि उल्हसित वातावरण असून, अभिनेत्री करिश्मा तन्नाच्या देखील घरी गणरायाचे आगमन झाले आहे. यावेळी अभिनेत्री पारंपारिक लूकमध्ये कमालीची सुंदर दिसत होती.
ऑफ व्हाईट कलरच्या साडीतील करिश्माचा घायाळ करणार अंदाज सर्वांच आवडला आहे. करिश्मा (karishma tanna) कुटुंबियांसोबत गणेशोत्सव साजरा करतेय. पती वरूण बंगेरासोबत तिने स्वतःचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
दरम्यान, करिश्मा आपल्या फिटनेस कडे विशेष लक्ष देते. ती रोज वर्कआउट आणि योगा करते. करिश्माने ‘क्योंकी साँस भी कभी बहू थी’, ‘नागार्जुन: एक योद्धा’, ‘कयामत की रात’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.
तसेच, नुकतंच प्रदर्शित झालेल्या ‘स्कूप’ या क्राईम ड्रामा वेब सीरिज मध्ये करिश्मा मुख्य भूमिकेत झळकली होती. स्कूप ही वेबसिरीज खऱ्या आयुष्यावर आधारित आहे. करिश्माशिवाय प्रोसेनजीत चॅटर्जी आणि हरमन बावेजा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
एका छोट्या शहरातील पत्रकार जीव धोक्यात घालून क्राईम रिपोर्टिंग करत असल्याचे वेब सिरीजमध्ये दाखवण्यात आले आहे. यात न्यूजरूम आणि क्राईम रिपोर्टर्सचा संघर्ष दाखवण्यात आला आहे.