बॉलीवूडमधील करिना कपूर खान आणि शाहीद कपूर यांच्या ब्रेकअपच्या बातम्या अनेक दिवस चर्चेत होत्या. दोघांनी ब्रेकअपचे कारण आजपर्यंत स्पष्ट केले नाही. दरम्यान नुकतंच करिनाने जब वी मेटच्या सेटवर शाहीदसोबत काम करण्याचा आणि त्यानंतर ब्रेकअप करण्याचा निर्णय, तसेच लगेच टशन चित्रपटाच्या सेटवर सैफ अली खानला भेटण्याचा अनुभव शेअर केला.
करिना जेव्हा इम्तियाज अली यांच्या जब वी मेटचे चित्रीकरण करत होती तेव्हा ती टशनमध्ये काम करण्यास जास्त उत्साही होती. या चित्रपटासाठी तिने वजनही कमी केले होते. तिला वाटत होते की टशनमध्ये तिचे खासगी आणि व्यावसायिक आयुष्य बदलेल. या सिनेमाबद्दल करिना म्हणाली, जब वी मेट हा तिचा सर्वात आवडता चित्रपट आहे.
यावेळी ती शाहीद कपूरला डेट करत होती आणि त्यानेच या चित्रपटात काम करण्यासाठी करिनाला मनवले होते. जब वी मेट सुपरहिट ठरला पण प्रदर्शनानंतर करिना आणि शाहिदचे ब्रेकअप झाले. शाहीदशी झालेल्या ब्रेकअपबद्दल करिना म्हणाली की, नशिबाचे आपल्यासाठीचे प्लॅन काही वेगळे असतात. जब वी मेट आणि टशनच्या दरम्यान असे काही झाले की ज्याने माझे संपूर्ण आयुष्य बदलून गेले.