करीना कपूर खान दुसऱ्यांदा आई बनल्याला आता सहा महिने होऊन गेले आहेत. आता करीना पुन्हा एकदा दमदार कमबॅक करण्याच्या तयारीत आहे. त्याची सविस्तर माहिती करीनाने दिलेली नाही. मात्र तिने एक सूचक पोस्ट शेअर केली आहे.
तिने तिच्या फॅन्सना ग्लोबल टेररच्या संदर्भाने एक अलर्ट दिला आहे. “इटली-9, जपान-7, बांगलादेश-7 आणि भारतातील 1 खतरनाक दहशतवादी हल्ल्यात इतके लोक मरत आहेत. दहशतवादाचे 12 तास. याची प्रतीक्षा 9.20 वाजता समाप्त होणार आहे.’ असे करीनाने म्हटले आहे आणि एक काऊंटडाऊन सुरू केले आहे.
करीना रात्री 9.20 वाजता आपल्या नवीन सिनेमाची घोषणा करणार असल्याचा अंदाज यामुळे व्यक्त व्हायला लागला. करीनाचा हा सिनेमा नक्की जागतिक दहशतवादी हल्ल्याशी संबंधित असणार एवढे मात्र तिच्या पोस्टवरून लक्षात आले आहे.
फेब्रुवारीमध्ये करीनाने आपल्या दुसऱ्या मुलाला जन्म दिल्यानंतर आतापर्यंत तिने स्वतःला पुन्हा फिट करण्यासाठी कसून मेहनत घेतली आहे. या सहा महिन्यात तिने 14 किलो वजन घटवले आहे. तिच्या नव्या सिनेमात तिचा बदललेला लुक बघायला मिळेलच.